esakal | दुर्दैवी! दोन ट्रकांच्या भीषण अपघातात 24 मजूरांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी! दोन ट्रकांच्या भीषण अपघातात 24 मजूरांचा मृत्यू

- उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातील एका अपघातात 24 प्रवासी मजूरांचा मृत्यू.

दुर्दैवी! दोन ट्रकांच्या भीषण अपघातात 24 मजूरांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातील एका अपघातात 24 प्रवासी मजूरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रवासी मजूर राजस्थान आणि हरियाणा राज्यातून आपल्या गावाकडे पलायन करत होते. यावेळी दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात मजूरांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या ट्रकमधील सर्वाधिक मजूर पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडचे रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद येथे रेल्वेने चिरडल्याने 16 प्रवासी मजूर मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असताना या नव्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये धडक झाली. यावेळी एका ट्रकमध्ये सुमारे 50 मजूर होते. ट्रकमध्ये असलेल्या पोत्यांवर हे मजूर बसले होते. ट्रक पलटी झाल्याने या पोत्याखाली अडकून श्वास गुदमरल्याने 24 मजूरांचा मृत्यू झाला. तर 15 मजूर जखमी झाले. जखमी मजूरांना औरैया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमींना सैफई मेडिकल विद्यापीठात हलवण्यात आलं आहे. राजस्थानची नंबरप्लेट असणाऱ्या ट्रकमधील मजूर प्रवासी उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार राज्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फरिदाबाद, दिल्लीवरुन येणारे मजूर याच मार्गावरुन आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले. जखमींवर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच पीडितांना सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवाय संबंधित अपघाताची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजूरांनी आपल्या गावाकडे पलायन करण्यास सुरुवात केली आहे. सर्व उद्योग-धंदे आणि इतर व्यवसाय ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या मजूरांना आपलं गाव आशा दाखवू लागलं आहे.

शिवाय लॉकडाऊन 4 जाहीर झाल्याने मजूरांचा धीर सुटत चालला आहे. सरकारकडून रेल्वे आणि बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी ती तोकडी असल्याने मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात मिळेल त्या वाहनाने पलायन करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.