आराम बसची ट्रकला धडक, बसचालक ठार

अमृत वेताळ
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे. 

बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे. 

प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक महामार्गवरून पुण्याकडे जात होता. त्या ट्रकला आज पहाटे 4.15 च्या सुमारास म्हैसूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या एसआरएसच्या आराम बसची पाठीमागून जोराची धडक बसली. यात बस चालक जागीच ठार झाला तर वाहक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात बस आणि ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगर गार्डननजीक अपघात घडल्याची माहिती मिळताच वाहतूक उत्तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of bus and truck bus driver dies