पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी

अमृत वेताळ
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्ण विधानसौध नजीकच्या एससी मोटर्स समोर शनिवारी (ता. 18) सकाळी 6.30 वाजता घडला. 

बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्ण विधानसौध नजीकच्या एससी मोटर्स समोर शनिवारी (ता. 18) सकाळी 6.30 वाजता घडला. 

पुणेहून बंगळूरकडे जाणाऱ्या व्हीआरलच्या आराम बसवरील चालकाचा सुटल्याने बस महामार्गावरील सुवर्ण विधान सौध उलटली. बसमध्ये एकूण 35 प्रवासी  होते. त्यापैकी 6 जण जखमी झाले. बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य जखमीना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ  वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. बस महामार्गावरून घसरत जाऊन बाजूच्या चारीत शिरली होती. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची आमदार अनिल बेनके यांनी विचारपूस केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of bus on pune banglore express way