लखनौ-आग्रा एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ४ जण ठार

वृत्तसंस्था
Tuesday, 18 February 2020

उत्तर प्रदेशातील लखनौ आग्रा एक्स्प्रेसवेवरील बिल्हौर येथे कार व बसच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील तिघे तर एका बसचालकाचा मृत्यू झाला आहे. ही बस आग्र्याहून बिहारमधील मुझफ्फरपूरकडे जात होती. बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समजते. 

कानपूर : उत्तर प्रदेशातील लखनौ आग्रा एक्स्प्रेसवेवरील बिल्हौर येथे कार व बसच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील तिघे तर एका बसचालकाचा मृत्यू झाला आहे. ही बस आग्र्याहून बिहारमधील मुझफ्फरपूरकडे जात होती. बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समजते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बसवरील नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरवरुन पलीकडे गेली. पलीकडच्या लेनमधील कारला जोरदार धडक देत ही बस पुढे निघून गेली. या जबरदस्त अपघातात कारचे पत्रे, काचा निखळल्या आहेत. अपघातातील इतर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघातानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident at Lucknow Agra highway near Kanpur