दिवसाला जमा होते 50 लाखांची बेहिशेबी रक्कम

महेश शहा
रविवार, 15 एप्रिल 2018

एसीबीची माहिती; 70 पेक्षा अधिक बॅंक खाती सील

अहमदाबाद: गांधीनगरमधील भू विकास महामंडळाच्या (जीएसएलडीसी) कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रोज नवनवीन माहिती बाहेर पडत आहे. महामंडळाच्या कार्यालयात दररोज सरासरी 50 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली असून, याप्रकरणी संशयितांची 70 पेक्षा जास्त बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत.

लाचलुचपत विभागाने (एसीबी) काल (ता. 13) महामंडळाच्या कार्यालयात छापा टाकून 56 लाख 50 हजार 500 रुपयांची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम बेहिशेबी असल्याचे आज स्पष्ट झाले. राज्यभरातून दिवसाकाठी सरासरी 50 लाख रुपयांची बिहिशेबी रक्कम कार्यालयात जमा होत असल्याचे एसीबीने म्हटले आहे. दरम्यान, संशयितांच्या मालमत्तांची झाडाझडती घेतली असता तेथूनही काही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

महामंडळाचे विभागीय संचालक के. सी. परमार यांच्या निवासस्थानाची आज झडती घेतली असता मौल्यवान वस्तू व रोख रक्कम असा एकूण 11.40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, व्यवस्थापकीय संचालक के. एस. देत्रोजा यांच्या ताब्यातील दागिने व रोख रक्कम मिळून 21 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: The accumulated amount of Rs 50 lakh accumulated on a daily basis