आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलिसांनी कुटुंबीयांना दिली सरकारी नोकरीची ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Police

आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलिसांनी कुटुंबीयांना दिली नोकरीची ऑफर

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत एका प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यानंतर कुटुंबीयांना हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं समोर आलं आहे. मृत अवस्थेत आढळलेल्या मुस्लीम व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी कुटुंबीयांना थेट नोकरीची ऑफर दिली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या अल्ताफचा भाऊ मोहम्मद सगीरने केलेल्या आरोपानुसार एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला एक पत्र लिहायला सांगितलं. या पत्रात त्याला आपला मृत भाऊ अल्ताफ हा नैराश्यग्रस्त होता असं लिहीण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतर मृत अल्ताफच्या वडीलांना पत्र वाचायला न देता त्यांचा अंगठा देखील घेण्यात आला.

हेही वाचा: तुम्ही डायमंड क्रॉसिंग बघितली का? भारतात कुठे आहे जाणून घ्या

पत्रावर "स्वाक्षरी" झाली तेव्हा चांद मियाँचा एक भाऊ, शाकीर अली देखील उपस्थित होता. यावेळी अल्ताफची आई फातिमा आणि डॉ फारूक नावाचा मध्यस्थ देखील उपस्थित असल्याचं सगीरने सांगितलं आहे. दरम्यान, अल्ताफ मंगळवारी कासगंज पोलीस ठाण्याच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या एका मित्रासह एका हिंदू अल्पवयीन मुलाच्या कथित पलायनाच्या प्रकरणात चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

loading image
go to top