Acharya Pramod: "गांधी घराणं CM काय PM ही बनवेल, आता पक्ष मजबूत करण्याची वेळ"

Congress party Rahul Gandhi and Sonia Gandhi
Congress party Rahul Gandhi and Sonia GandhiSakal

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षाध्यक्ष झाले तर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असे बोलले जात आहे. ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ज्यावर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. (Congress news in Marathi)

Congress party Rahul Gandhi and Sonia Gandhi
Bhavana Gawali: उद्धव यांच्या 'बाई' टीकेवर भावना गवळी संतापल्या; म्हणाल्या, ठाकरे...

आचार्य प्रमोद यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, 'खुर्चीची आग्रह सोडून पक्षाला सक्षम करण्याची वेळ आली आहे. हे गांधी घराण्याला मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान देखील करू शकतं. त्यामुळे संघर्षाच्या काळात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आग्रह करून पक्षनेतृत्वाला आणखी अडचणीत आणण्याचे पाप करू नका.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही टॅग केले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

अभिमन्यू नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिलंय की आचर्य प्रमोदजी अगदी बरोबर बोलत आहे. सचिन पायलट यांना आता राजस्थानचे मुख्यमंत्री करावे. अरविंद शुक्ला यांनी टिप्पणी केली की, खुर्चीचा मोह कसा सोडता येईल, त्यांना हे देखील माहित आहे की काँग्रेस अध्यक्षपदावर काहीही फायदा होणार नाही कारण सर्व निर्णय गांधी कुटुंब घेईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com