Manoharlal Khattar
Manoharlal KhattarTeam eSakal

खट्टरांना खटकली नमाजची पद्धत; म्हणाले हे सहन करणार नाही...

हरियाणाच्या गुरुग्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे.
Published on

हरियाणाच्या (Haryana) गुरूग्रामध्ये (Gurugram) गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि मुस्लीम धर्मियांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शहरातील काही मोकळ्या ठिकाणी मुस्लीम समाजाकडून नमाज (Namaz) पठण करणाऱ्या मुस्लीम धर्मियांच्याविरोधात काही हिंदू संघटनांकडून निदर्शनं केली गेली. काही काळ संघर्ष निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यातच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, हे सहन केलं जाणार नाही असं सांगितलं आहे.

Manoharlal Khattar
आम्ही जातो आमुच्या गावा...सिंघू बॉर्डरवरून शेतकरी माघारी!

गुरूग्राममध्ये सुरू असणाऱ्या या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच काल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका बैठकीसाठी शहरात आले असता काही संघटनांनी त्यांच्याकडे ही मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी यावर बोलताना सांगितलं की, उघड्यावर नमाज पठण करण्याची ही पद्धत अजिबात सहन केली जाणार नाही. यावर एकत्र बसून लवकरात लवकर तोडगा काढावा अशी कठोर भूमिका खट्टर यांनी घेतली आहे.

Manoharlal Khattar
"सरकार फक्त मेकअप करतंय, खरं चित्र भेसूर..."; सेनेचा केंद्रावर निशाणा

दरम्यान, खट्टर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस आणि प्रशासनाने देखील हा वाद सोडवावा लागणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com