
Uttarakhand :
भ्रष्टाचारासारखा गुन्हा दाखल झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या केस कोर्टात अनेक वर्षे चालतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, उत्तराखंड राज्यात भ्रष्टाचाराला थारा नाहीच, या तत्वावर धामी सरकारने ताबडतोप कारवाई केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानुसार पेयजल निगमचे मुख्य अभियंता सुजीत कुमार यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या शासकीय जबाबदाऱ्यांच्या पार पाडण्यात कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाच्या घटनांवर त्वरित कारवाई सुनिश्चित केली जात आहे. उत्तराखंड पेयजल निगमचे अध्यक्ष शैलेष बगोली यांनी कर्मचारी आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल सुजीत कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.