esakal | धर्मेंद्र म्हणाले; योगायोग! माझ्या अंगणात मोरनी आली पण...
sakal

बोलून बातमी शोधा

actor dharmendra shares video of peacock at his farm house

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय पक्षी मोराला हाताने दाने खाऊ घालत असतानाचा व्हिडिओ शेअर झाला आहे. यानंतर अभिनेते धर्मेंद्र यांच्या अंगणात मोरणी आली. त्यांनी व्हिडिओ शेअर केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धर्मेंद्र म्हणाले; योगायोग! माझ्या अंगणात मोरनी आली पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय पक्षी मोराला हाताने दाने खाऊ घालत असतानाचा व्हिडिओ शेअर झाला आहे. यानंतर अभिनेते धर्मेंद्र यांच्या अंगणात मोरणी आली. त्यांनी व्हिडिओ शेअर केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धर्मेंद्र हे ट्विटरवरून अनेकदा व्हिडिओ शेअर करत असतात. कोरोनामुळे ते फार्म हाऊसवर वास्तव्यास असून, शेतात पिकविलेला भाजीपाला धुताना व ट्रॅक्टरने शेतीची मशागत करतानाचे व्हिडिओ यापूर्वी शेअर केले आहेत. धर्मेंद्र यांनी मंगळवारी आपल्या फार्म हाऊसचे एक सुंदर दृश्य सोशल मीडियावर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या अंगणात एक मोरनी आली. त्यांनी म्हटले आहे की, 'काय योगायोग आहे… काल मोदीजींच्या अंगणात मोर नाचताना दिसला.. आज माझ्या अंगणात जंगलातून एक मोरनी आली. व्हिडिओ काढू शकलो नाही, ती पळून गेली. आम्ही वाट पाहू..'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ते मोराला हाताने दाने खाऊ घालताना दिसत आहेत.

loading image
go to top