रन्या हिला दुबईच्या प्रत्येक ट्रिपसाठी सुमारे १२ लाख मिळत असल्याचा संशय आहे. रन्याने १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केला आहे. वर्षात तिने ३० वेळा प्रवास केला आहे.
बंगळूर : पोलिस महासंचालकांची (Director General of Police) सावत्र मुलगी असलेल्या कन्नड अभिनेत्री रन्या राव (Actress Ranya Rao) हिचे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या कुख्यात तस्करांशी संबंध असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटकेनंतर रन्या रावची चौकशी करणाऱ्या डीआरआय अधिकाऱ्यांना तिच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.