
रायपूर - अभिनेत्री सनी लिओनी हिच्या नावावर छत्तीसगड सरकारच्या योजनेचे दरमहा एक हजार रुपये बँकेत जमा होत आहेत. वास्तविक तिच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आल्याचे रविवारी (ता.२२) उघडकीस आहे. या खात्यात गेल्या दहा महिन्यांपासून योजनेचे पैसेही जमा होत आहेत.