नवी मुंबई विमानतळाला 'बंताक्रूझ' नाव देण्याचा सल्ला; केंद्रीय मंत्र्यांचं अभिनेत्रीला उत्तर

वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
aviation minister hardeep singh puri
aviation minister hardeep singh puri

नवी मुंबई विमानतळाला navi mumbai airport कोणाचं नाव द्यायचं, यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. एकीकडे विमानतळाला स्थानिकांनी रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यातच आता नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी Hardeep Singh Puri यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. अभिनेत्री, गायक सुचित्रा कृष्णमूर्तीच्या Suchitra Krishnamoorthi एका ट्विटवर पुरी यांनी उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे सुचित्राने हे ट्विट २०१९ साली केलं होतं. (actress wants to rename navi mumbai airport bandtacruz here is how aviation minister responded)

काय होतं सुचित्रा कृष्णमूर्तींचं ट्विट?

'बंताने नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र पाठवून नवी मुंबई विमानतळाचं नाव बंताक्रूझ ठेवावं अशी विनंती केली आहे. कारण त्याचा भाऊ संता याच्या नावावर सांताक्रूझ हे विमानतळ आहे', असं विनोदी ट्विट तिने केलं होतं.

aviation minister hardeep singh puri
नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल - राज ठाकरे

हरदीप सिंग पुरी यांचं उत्तर-

सुचित्रा यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत पुरी यांनी म्हटले, 'सध्या अस्तित्त्वात असलेल्या आणि निर्माणाधीन विमानतळांचे नाव बदलण्यासाठी किंवा नवीन नाव ठेवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाला अनेक विनंत्या येत आहेत. थोडंसं वातावरण (मूड) हलकं करण्यासाठी मला माझा मित्र बंताला सांगायचे आहे की त्याच्या नावाचा औपचारिक प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही.'

या दोघांच्या ट्विटवर सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com