Adani Row : हिंडेनबर्ग वादात महुआ मोईत्रांची उडी; म्हणाल्या, सेबी अधिकाऱ्यांचा...

प्रसिद्ध वकील सिरिल श्रॉफ यांच्याबद्दल खूप आदर असल्याचे मोईत्रा यांनी म्हटले आहे.
Adani Group Controversy
Adani Group ControversySakal

Adani Group Controversy : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च आणि अदानी समूहाच्या वादात आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रांनीदेखील उडी घेतली आहे. (TMC Leader Mahua Moitra Tweet On Adani Group Controversy)

Adani Group Controversy
Terror Threat Mail : NIA ला मिळाला मुंबई उडवण्याचा ई-मेल; देशभरात हाय अलर्ट जारी

अदानींच्या या प्रकरणात सेबीच्या अधिकाऱ्यांचा अदानी कुटुंबाशी संबंध असल्याचा आरोप महुआ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यानंतर आता यावरून आणखी वाद चिघळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मोईत्रा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध वकील सिरिल श्रॉफ यांच्याबद्दल खूप आदर आहे, पण त्यांच्या मुलीचे लग्न गौतम अदानी यांच्या मुलाशी झाले आहे.

श्रॉफ सेबीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इनसाइडर ट्रेडिंगच्या समितीवर काम करतात. जर सेबी अदानी प्रकरणाची चौकशी करत असेल तर, श्रॉफ यांनी स्वतःहून यापासून दूर राहण्याचा सल्ला मोईत्रा यांनी ट्वीटमध्ये दिला आहे.

2013 मध्ये गौतम अदानी यांचा मुलगा करणचा विवाह प्रसिद्ध वकील सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधीशी झाला होता.

Adani Group Controversy
Supreme Court : VRS घेणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; समानतेचा दावा करू शकत नाही

यावेळी मोईत्रा यांनी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सने (Dow Jones Sustainability Index) त्यांच्या निर्देशांकातून अदानी समूहाचे शेअर्स काढून टाकण्याचा निर्णयावरदेखील भाष्य केले आहे.

त्या म्हणाल्या की, 'NSE अदानी शेअर्सच्या इंडेक्स मेंबरशिपचे पुनर्मूल्यांकन का करत नाही? असा प्रश्न मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्गने अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप केले होते. त्यानंतर देशभरातील वातावारण तापले असून, याचा फटका शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com