esakal | अदानी ग्रुपने मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला केलं स्थलांतरित
sakal

बोलून बातमी शोधा

अदानी ग्रुपने मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला केलं स्थलांतरित

अदानी ग्रुपने मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला केलं स्थलांतरित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवण्यात आले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'च्या म्हणजे एएएचएल ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे. जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा स्वत:कडे घेतला आहे.

१३ जुलै रोजी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. याबरोबर येऊ घातलेल्या व बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाचा ताबाही एएचएलकडे गेला आहे. मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलने मुंबईत मुख्यालय थाटले होते. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन व्यवस्थापन पूर्ण होताच मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. “अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.” असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे.

हेही वाचा: First Time Voter : मतदान ओळखपत्र हवेय; पण ते कसं काढायचं?

गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम या विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा अदानी ग्रुपकडे आहे

loading image