
Adani Group Row : अदानींच्या मदतीला धावून आले मोदी; म्हणाले, JPC पोरखेळ नाही, हवं तर...
नवी दिल्ली : विरोधक सातत्याने अदानी समूहावर हल्ला बोल करत आहेत. काँग्रेसने अदानी समूहाविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भाजप नेते सुशील मोदी अदानी यांचा बचाव करण्यासाठी समोर आले आहेत. तसेच बीबीसी-राफेल प्रकरणाप्रमाणे विरोधक सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. (Adani Group Row news in Marathi)
भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी अदानी समूहाविरोधात घोटाळा आणि स्टॉक हेराफेरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) स्थापन करण्याच्या मागणीवर भूमिका स्पष्ट केली. सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा विरोधकांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे त्यांनी शुक्रवारी सांगितले. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थसंकल्पावरील चर्चा ज्यादरम्यान त्यांना या विषयावर जे काही बोलायचे आहे ते सांगता येईल.
मोदी पुढं म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत जेपीसी स्थापन होऊ शकत नाही. जेपीसी काही पोरखेळ नाही. जेपीसीच्या निर्मितीसाठी उद्दीष्ट असायला हवं. त्यासाठी सभागृहात गोंधळ घालण्याची गरज नाही. तुम्ही सभागृह चालू द्या आणि तुमचा मुद्दा उपस्थित करा. बीबीसीडॉक्युमेंटरी आणि राफेलच्या मुद्द्यावरून लोक कोर्टात गेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की सरकार योग्य प्रतिसाद देत नाही, तर तुम्ही सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाण्यास मोकळे आहात. आपल्याकडे हा पर्याय उपलब्ध आहे, असही मोदींनी सांगितलं.