PM मोदींच्या सभांचा खर्च पक्षाच्या खर्चात जोडावा; भाजपची निवडणूक आयोगाला विनंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

PM मोदींच्या सभांचा खर्च पक्षाच्या खर्चात जोडावा; भाजपची निवडणूक आयोगाला विनंती

गुजरातमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील निवडणूक रॅलींवरील खर्चाची रक्कम पक्षाच्या खर्चात जोडावी, अशी मागणी भाजपने केली आहे. दुसरीकडे, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची मागणी काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे (CEC) केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दोन दिवसीय राज्य दौऱ्यावर आहेत.

गुजरातचे संयुक्त निवडणूक अधिकारी अशोक पटेल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि राजकीय प्रतिनिधींना भेटण्यासाठी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे.

सत्ताधारी भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटी दरम्यान मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी केली. पक्षाच्या वतीने गुजरात भाजपचे उपाध्यक्ष गोर्धन जडाफिया यांनी गांधीनगरमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.

हेही वाचा: CM: तर एकनाथ शिंदेंना देखील माफी मागावी लागेल: राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका

भेटीनंतर जदाफिया यांनी पत्रकारांना सांगितले की, "आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी केली आहे की, कामगार आयुक्त किंवा इतर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने मतदानाच्या दिवशी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत जेणेकरून त्यांना मतदाना करता येईल. त्यामुळे मतदानात वाढ होईल.