Adi Kailash Parikrama Run 2.0: हिमालयात धावण्याचा थरार अनुभवायचाय? मे २०२७ मध्ये रंगणार १०० माइल्स अल्ट्रा रन

Adi Kailash Run 2027 : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मे २०२७ च्या पहिल्या आठवड्यात १०० माइल्स हिमालयन एंड्युरन्स अल्ट्रा रन आयोजित करण्याची घोषणा केली. माणा पास ते औली या सुमारे १६० किलोमीटरच्या मार्गावरील स्पर्धेतून साहसी पर्यटन आणि सीमावर्ती गावांतील रोजगाराला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami announces a 100-mile Himalayan endurance ultra run planned for May 2027 to promote adventure tourism and border village development.

Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami announces a 100-mile Himalayan endurance ultra run planned for May 2027 to promote adventure tourism and border village development.

esakal

Updated on: 

उत्तराखंड ;उत्तराखंडमध्ये साहसी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आणखी एका महत्त्वाकांक्षी स्पर्धेची घोषणा केली आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील दुर्गम गुंजी येथे आयोजित ‘आदि कैलाश परिक्रमा रन-२.०’मध्ये सहभागी होत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मे २०२७ च्या पहिल्या आठवड्यात ‘१०० माइल्स हिमालयन एंड्युरन्स अल्ट्रा रन’ आयोजित करण्याची घोषणा केली. या स्पर्धेच्या माध्यमातून हिमालयातील साहसी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच सीमावर्ती गावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com