Independence Day : अदनान सामीने असे काय केले, की पाकिस्तानी भडकले?

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

प्रख्यात गायक अदनान सामी याने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच पाकिस्तानकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे पाकिस्तानी चाहते चांगलेच भडकले आहेत. अदनान याला देशद्रोही ठरविण्यापर्यंत पाकिस्तानी चाहत्यांची मजल गेली आहे. अदनानही काही कमी नाही. 'जिना हेदेखील मातृभूमीशी प्रामाणिक नव्हते,' असा आरोप करून त्याने पाकिस्तानचे निर्माते महम्मद अली जिना यांनाही वादात ओढले आहे.

कराची : प्रख्यात गायक अदनान सामी याने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच पाकिस्तानकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे पाकिस्तानी चाहते चांगलेच भडकले आहेत. अदनान याला देशद्रोही ठरविण्यापर्यंत पाकिस्तानी चाहत्यांची मजल गेली आहे. अदनानही काही कमी नाही. 'जिना हेदेखील मातृभूमीशी प्रामाणिक नव्हते,' असा आरोप करून त्याने पाकिस्तानचे निर्माते महम्मद अली जिना यांनाही वादात ओढले आहे.

अदनान मुळचा पाकिस्तानी. त्याच्या आवाजाची भुरळ बॉलीवूडला पडली आणि भारतीय चाहत्यांनाही. त्याचा जन्मदिवसही १५ ऑगस्ट. लंडनमध्ये पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱयाच्या कुटुंबात जन्मलेला अदनान मुंबईत राहतो. पाकिस्तानी पासपोर्टवर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या अदनानला तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरीकत्व मिळाले आहे.

ट्विटरवर पाकिस्तानी चाहते त्याला सातत्याने ट्रोल करतात. आज त्याच्या वाढदिनीही ट्रोलिंगला अपवाद नव्हता. भारतीय स्वातंत्र्यदिनी त्याने 'सारे जहाँ सें अच्छा हिंदोस्ता हमारा...' असे ट्विट केले तेव्हा, भारतीय चाहत्यांनी अदनानला डोक्यावर घेतले; तर पाकिस्ती चाहत्यांनी देशद्रोही ठरविले.

अदनान मातृभुमीशी प्रामाणिक नाही, असे ट्विट एका पाकिस्तानी चाहत्याने केले, त्यावर अदनानने थेट जिना यांना वादात ओढले.
 

अदनानचा पाकिस्तानी पासपोर्ट २०१५ मध्ये समाप्त झाल्यावर त्याने भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज केला होता. १ जानेवारी २०१६ पासून त्याला भारतीय नागरीकत्व देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adnan sami tweeted for Indias independence day