esakal | राहुल गांधी यांच्या फेरनिवडीवर प्रतिकूल परिणाम शक्य

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्या फेरनिवडीवर प्रतिकूल परिणाम शक्य
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानोत्तर कल चाचणीतून कॉंग्रेसला फारसे आशादायक चित्र नसल्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. याचा प्रतिकूल परिणाम राहुल गांधींच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी फेरनिवडीवर होऊ शकतो. शिवाय, अंतिम निकालात कॉंग्रेसला यश गवसले नाही तर राहुल यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारा पक्षातील असंतुष्ट गट सक्रिय होऊ शकतो.

राहुल गांधींनी सर्वाधिक ताकद पणाला लावलेल्या केरळमधील कल सत्ताधारी डाव्या आघाडीला पुन्हा संधी देणारे असून कॉंग्रेससाठी फारसे अनुकूल नाहीत. तर आसाममध्येही भाजपला सत्तेत पुनरागमनाचा कौल मिळत आहे. हे कल म्हणजे अंतिम निकाल नव्हे परंतु कॉंग्रेसमधील जुन्या नेत्यांनी याआधारे निकाल गृहित धरून राहुल आणि नव्या फळीच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीला जाब विचारण्याची तयारी चालविल्याचे कळते.