esakal | आंध्रप्रदेशात तिरुपती बस तिकिटावर जेरुसलेम, हजच्या जाहिराती
sakal

बोलून बातमी शोधा

तिरुपती बस तिकिटावर जेरुसलेम, हजच्या जाहिराती

आंध्र प्रदेशातील तिरुपती ते तिरुमाला या बसच्या तिकिटावर जेरुसलेम आणि हज यात्रेसाठीच्या सरकारी जाहिराती दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. आंध्र प्रदेश सरकार धर्मांतराला प्रोत्साहन देत असल्याची टीका भाजपने केली आहे.

आंध्रप्रदेशात तिरुपती बस तिकिटावर जेरुसलेम, हजच्या जाहिराती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील तिरुपती ते तिरुमाला या बसच्या तिकिटावर जेरुसलेम आणि हज यात्रेसाठीच्या सरकारी जाहिराती दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. आंध्र प्रदेश सरकार धर्मांतराला प्रोत्साहन देत असल्याची टीका भाजपने केली आहे.

आंध्रप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एपीएसआरटीसी) तिरुपती ते तिरुमाला या बसच्या तिकिटांच्या मागे हज आणि जेरूसलेमच्या यात्रेविषयी सरकारी जाहिराती देण्यात आल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंबंधीची माहिती परिवहन मंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिली. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापकांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, बिगर-हिंदू यात्रेबद्दलचे मुद्रित तिकिटांचे एक बंडल
चुकून तिरुपतीहून तिरूमालाकडे जाणाऱ्या बसमध्ये पाठवले गेले.

तर आंध्रप्रदेश सरकारमधील मंत्री, वेलंपल्ली श्रीनिवास यांनी या संपूर्ण प्रकरणावर निवेदन देताना म्हटले आहे की, तिकिटाच्या मागील भागावर जाहिरात देण्याची निविदा तृणमूल देसम पार्टी (टीडीपी) सरकारने दिली होती. टीडीपी आणि भाजपचे किरकोळ कारणावरुन मुख्यमंत्र्यांवर अवांछित आरोप करत आहेत. याशिवाय तिकिटांच्या माध्यमातून जे लोक असा प्रचार करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एपीएसआरटीसी) म्हटले आहे की, भाविकांच्या भावना लक्षात घेऊन ही तिकिटे मागे घेण्यात आली आहेत. पुन्हा अशा घटना टाळण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करून, यासंबंधीची माहिती मिळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

loading image
go to top