Supreme Court : प्रशांत भूषण यांना दिलासा देत सुप्रीम कोर्टानं बंद केली 2009 ची केस; काय होतं प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Advocate Prashant Bhushan

प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Supreme Court : प्रशांत भूषण यांना दिलासा देत सुप्रीम कोर्टानं बंद केली 2009 ची केस; काय होतं प्रकरण?

प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण (Advocate Prashant Bhushan) यांना आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांच्याविरोधात दाखल केलेला अवमान खटला बंद केलाय.

2009 मध्ये तहलका मासिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर अवमानाचा खटला सुरू होता, तो आता बंद करण्यात आलाय. भारताचे 16 माजी सरन्यायाधीश भ्रष्ट असल्याचं प्रशांत भूषण यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: High Court : सेक्स करण्यापूर्वी आधार आणि पॅन कार्ड पाहण्याची गरज नाही; हायकोर्टानं असं का म्हटलं?

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी प्रशांत भूषण यांची बाजू मांडणारे अधिवक्ता कपिल सिब्बल म्हणाले, या प्रकरणी माफी मागितली आहे. यानंतर न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सांगितलं की, ज्या लोकांनी अवमान केला आहे त्यांनी दिलेली माफी लक्षात घेता, आम्ही अवमानाची कारवाई पुढं जाणं आवश्यक मानत नाही. ही अवमानाची कारवाई बंद केली जाते, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

हेही वाचा: UP : भाजप अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भूपेंद्र चौधरींनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

काय आहे नेमकं प्रकरण

नोव्हेंबर 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांच्या विरोधात अवमानाच्या नोटिसा जारी केल्या. दोघांवर ‘तहलका’ या वृत्तपत्रिकेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान काही विद्यमान न्यायाधीश आणि माजी न्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. तरुण तेजपाल त्यावेळी या मासिकाचे संपादक होते. 2009 च्या या अवमान प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रशांत भूषण म्हणाले होते की, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या न्यायाधीशांवर अवमानाची कारवाई होऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याविरुध्द याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा आज निकाल लागला असून प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Web Title: Advocate Prashant Bhushan Got Relief In Contempt Of Court Supreme Court Closed Case Of 2009

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Courtdelhi