
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये सरकारने महिलांच्या कामाबाबत नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार कोणत्याही महिलेला संध्याकाळी सात वाजेच्या नंतर काम करण्यासाठी बळजबरी करण्यात येणार नाही. ज्या महिला सायंकाळी सातच्या नंतर काम करण्यास सहमत असतील त्यांच्यासाठी वाहतुकीच्या सेवा पुरवण्यात याव्यात असे आदेश उत्तरप्रदेश सरकारने दिले आहेत.
(No woman can be forced to work beyond 7 pm)
उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रपाळीत महिला कारखान्यात किंवा फॅक्टरीत काम करतात. त्यामुळे ज्या महिलांची सहमती आहे त्याच महिला सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत काम करू शकतात. ज्या महिलांना रात्री काम करण्याची इच्छा नाही अशा महिलांनी कंपनी बळजबरी करू शकत नाही. महिलांच्या लेखी परवानगी नंतर त्या रात्रपाळीत काम करू शकतात असा निर्णय सरकारने दिला आहे. ज्या महिला रात्री काम करतात अशा महिलांना जेवण आणि वाहतूक व्यवस्था कंपनीने पुरवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
उत्तरप्रदेश सरकारने परिपत्रक काढून नियमांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये ज्या महिला रात्री काम करण्यास नकार देतात त्यांना कंपनी कामावरून काढू शकत नाही. तसेच महिलांना स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम या सुविधा पुरवण्यात याव्यात. लैंगिक छळाबाबत व्यवस्था करण्याची जबाबदारी कंपनीची असेल असे नियम सरकारने घातले आहेत. दरम्यान महिलांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अहवालानुसार, भारतातील 15-49 वयोगटात महिलांपेक्षा तिप्पट पुरुष आहेत. नोकरदार पुरूषांच्या तुलनेत बिहारमध्ये (14 टक्के), उत्तर प्रदेशमध्ये (17 टक्के) आणि आसाममध्ये (18 टक्के) महिला काम करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.