
कोटा (राजस्थान) : राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या एका वस्तीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७८ वर्षांनंतर वीजजोडणी झाली आहे. गावकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर या गावात आता वीजेचा प्रकाश पडत आहे. या वस्तीतील प्रत्येक घरात वीजपुरवठा सुरू झाला आहे.