esakal | गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट | Cyclone Shaheen
sakal

बोलून बातमी शोधा

गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Cyclone Shaheen : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. मंगळवार (ता. २७)पासून सूरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने मराठवाड्यात अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. बुधवारीही (ता. २८) अनेक जिल्ह्यांत पावसाचा दणका सुरूच होता. सद्या गुलाब चक्रीवादळ ओसरले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे (डिप्रेशन) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २९) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातातून आलेल्या 'गुलाब' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि ओडिशाला अतिवृष्टीचा फटका बसला असून जनजिवन विस्कळीत झालं आहे. गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरत असतानाच आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

गुलाब चक्रीवादळाची तीव्रता ओसरत असून, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दुपारी ही प्रणाली नागपूरपासून दक्षिणेकडे २५० किलोमीटर, तर परभणीपासून उत्तर पूर्वेकडे ६० किलोमीटर अंतरावर होती. रात्री उशिरा ही प्रणाली निवळून ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यानंतर ही प्रणाली अरबी समुद्रात जाऊन, पुन्हा तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. गुलाब चक्रीवादळाची तिव्रता शांत होत नाही तोच शाहीन चक्रीवादळाचा धोका उद्भवाला आहे. अरबी समुद्रातून शाहीन चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला धडकण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

'शाहीन' चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होणार आहे. शाहीन हे नाव ओमन देशानं दिलेलं आहे. छत्तीसगढमार्गे मराठवाडा विदर्भात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दुपारी ही प्रणाली नागपूरपासून दक्षिणेकडे २५० किलोमीटर, तर परभणीपासून उत्तर पूर्वेकडे ६० किलोमीटर अंतरावर होती. रात्री उशिरा ही प्रणाली निवळून ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रात पोहचेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रात पोहचेच, त्यानंतर त्याचं रुपांतर चक्रीवादळात होऊ शकतं. शाहीन या वादळाच्या हालचालींवर IMD चं सतत लक्ष आहे. शाहीन चक्रीवादळ गुलाब चक्रीवादळापेक्षा भयंकर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

loading image
go to top