CM योगींचं 'ते' भाषण ऐकून मोठ्या गुन्हेगारानं पत्करली शरणागती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

CM योगींचं 'ते' भाषण ऐकून मोठ्या गुन्हेगारानं पत्करली शरणागती

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री (CM Yogi Adityanath) झाल्यापासून गुन्हेरागी कमी झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून वारंवार केला जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील स्वत: आपल्या भाषणातून ही गोष्ट बोलून दाखवतात. त्यातच त्यांनी सोमवारी केलेल्या एका भाषणात त्यांनी गुन्हेगारांना शरण येण्याचं आवाहन करत शरण न आल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. त्यानंतर आता त्याचे परिणाम दिसायला सुरूवात झाल्याचं दिसतं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कैरानमध्ये एका सभेला संबोधित करताना गुन्हेगारांना पोलिसांना शरण या अन्यथा मारले जाल असं आवाहन केलं होतं. त्यानंतर राज्यात त्याचे परिणाम दिसायला सुरूवात झाली असून, कैरानमध्ये बुधवारी एक वेगळीच घटना समोर आली. यामध्ये एका कुख्यात गुंडाने जामीन घेण्यास नकार देत न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. 16 ऑगस्ट 2014 रोजी बिझनेस बोर्डाचे कोषाध्यक्ष विनोद सिंघल यांची बेगमपुरा मार्केटमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी वाँटेड असलेल्या फुरकानला पोलिसांनी अटक करून २०१७ मध्ये तुरुंगात पाठवले. फुरकान जामिनावर बाहेर होता. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या भाषणातून मिळालेल्या संदेशानंतर त्याने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं.

हेही वाचा: 'जय श्रीराम' म्हणणारे संत नसून 'राक्षस'? काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

फुरकानसह आणखी एक माफिया सुद्धा पोलिसांना शरण आला आहे, पोलिसांनी यापुर्वीच त्यांची संपत्ती जप्त केली असून, त्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी सुरू आहे. त्यांच्या संबंधीत अनेकांवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर ते घाबरून शरण आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

loading image
go to top