भाजपमध्ये जाताच ज्योतिरादित्य शिंदेवरील 'हा' गुन्हा रद्द

वृत्तसंस्था
Tuesday, 24 March 2020

मध्य प्रदेशातील आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कार्यालयाने ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवर दाखल असलेला गुन्हा रद्द केला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून जमीन विकल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता घालवून भाजपची सत्ता आणण्याची मोलाची भूमिका बजाविणारे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरील खोटी कागदपत्रे देऊन जमीन विकल्याचा गुन्हा रद्द करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कार्यालयाने ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवर दाखल असलेला गुन्हा रद्द केला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून जमीन विकल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2009 मध्ये ग्वाल्हेरमधील जमीन विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. 

शिंदे यांनी 10 मार्चला काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासह 22 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. भाजपने शिंदे यांना राज्यसभेत खासदार म्हणून निवडले आहे. या सर्व घडामोडींनंतर मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After his BJP entry forgery case against Jyotiraditya Scindia closed