लॉकडाउन संपल्यानंतर पहिली प्रेयसी परतल्यामुळे त्याने नव्या गर्लफ्रेंडची केली हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 break up

लॉकडाउन संपल्यानंतर पहिली प्रेयसी परतल्यामुळे त्याने नव्या गर्लफ्रेंडची केली हत्या

नवी दिल्ली: प्रियकराने ३० वर्षीय प्रेयसीची हत्या (Girlfriend killed) करुन तिचा मृतदेह जंगलात फेकून (Throw body in forest) दिला. दक्षिण दिल्लीतील मैदान गारही भागात रविवारी संध्याकाळी महिलेचा मृतदेह सापडला. (dead body) संशय आपल्यावर येऊ नये, यासाठी आरोपीने बनावट कथानक रचलं. मित्राला फोन करुन पोलिसांना मृतदेहाची माहिती देण्यास सांगितले. लॉकडाउन (lockdown) लागल्यानंतर पहिली प्रेयसी तिच्या घरी निघून गेली. त्यावेळी आरोपी अनुज कुमारचे दुसऱ्या महिलेसोबत सूत जुळले. त्याने तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली.

पहिली प्रेयसी परत आल्यानंतर त्याला नव्या गर्लफ्रेंडपासून स्वत:ची सुटका करुन घ्यायची होती. त्यामुळे त्याने मित्रांसोबत मिळून दुसऱ्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा कट रचला. दुसऱ्या गर्लफ्रेंडची हत्या करताना आरोपी अनुज तिथे उपस्थित होता. त्याच्या दोन मित्रांनी गळा आवळून दुसऱ्या गर्लफ्रेंडची हत्या केली. अनुजसोबत गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले कुमार रमजान खान (३२) आणि नौशाद (२१) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा: प्रवासी वाहनांच्या विक्रीत 45 टक्क्यांनी वाढ

अनुज कुमारचे आधीपासूनच तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे अनुज कुमारने रमजान आणि नौशादला सांगून नवीन गर्लफ्रेंडची हत्या केली. तिघांनी मिळून महिलेची हत्या करण्याचा कट रचला. नौशाद आणि अनुज कुमार पीडित महिलेला जंगलात घेऊन गेले. तिथे रमजान आधीपासून उपस्थित होता. त्यांनी तिथे गळा आवळून महिलेची हत्या केली.

हेही वाचा: कुलभूषण जाधव ISI च्या जाळ्यात कसे अडकले? पुस्तकातून खुलासा

रमजानने नंतर पोलिसांना फोन केला. मी जंगलात ड्रींक करत असताना, बाईकवरुन दोनजण एक महिलेला घेऊन आले. त्यांनी महिलेची हत्या केली असे सांगितले. पोलिसांनी रमजानची उलट तपासणी घेतल्यानंतर त्याच्या जबानीत विरोधाभास आढळून आला. रमजानचे मोबाइल फोनचे नेटवर्क तपासण्यात आले. अखेर त्याने मृत महिलेला ओळखत असल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्याची उकल झाली. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि ओढणी पोलिसांनी जप्त केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhi
loading image
go to top