
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय ऐक्याचा संदेश जगभरात पोचविण्याबरोबरच दहशतवादी पाकिस्तानचा भंडाफोड करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठविण्याचे नियोजन केंद्र सरकारने आखले आहे. त्यासाठी विरोधी खासदारांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना या शिष्टमंडळांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.