
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातून लक्ष्य करण्यात आले आहे. थरूर यांनी सरकारची प्रशंसा केल्यावरून काँग्रेसचे नेते उदित राज यांनी थरूर यांना परराष्ट्र मंत्री बनवा असा खोचक सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला होता. त्याच मालिकेत आज काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी, पूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकवर शशी थरूर यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत थरूर यांना लक्ष्य केले.