भाजपचे आतापासूनच ‘चलो दिल्ली’ 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 16 November 2020

लोकसभेतील विजयाचा मार्ग उत्तर प्रदेश आणि बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून जातो, हे लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा उत्साह दुणावला असून पक्षनेतृत्वाने थेट २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला गती दिली आहे. विविध राज्यांच्या प्रभारींच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा लवकरच शंभर दिवसांचा देशव्यापी दौरा करतील. यासाठी ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार गटांमध्ये पक्षाला अनुकूल, प्रतिकूल आणि मध्यम अशा विविध भागांची विभागणी केली आहे. लोकसभेतील विजयाचा मार्ग उत्तर प्रदेश आणि बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून जातो, हे लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नड्डा दौऱ्यात सर्वाधिक आठ दिवस उत्तर प्रदेशात घालवणार आहेत. ते संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील तयारीसाठी लोकप्रतिनिधी, राज्याराज्यांतील नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गटनिहाय राज्ये
अ गट :
भाजपची मित्रपक्षाला बरोबर मिळून सत्ता आहे अशी नागालँड, बिहार, कर्नाटक, त्रिपुरा ही राज्ये

ब गट : भाजपची सध्याच्या घडीला सत्ता नाही अशी महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्ये

क गट : लक्षद्वीप, मेघालय, मिझोराम आदी छोटी राज्ये

ड गट : प. बंगालनंतर सर्वात आव्हानात्मक असलेल्या केरळसह आसाम, पुद्दुचेरी आणि तमिळनाडूसारखी राज्ये
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the victory in the Bihar Assembly elections the enthusiasm of the BJP leadership increased