Loksabha 2019 : जडेजाची बायको भाजपमध्ये, तर वडील आणि बहिण...!

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जामनगर जिल्ह्यातील कालवाड शहरात रविवारी झालेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह आणि बहिण नैनबा यांनी काँग्रेसच्या हातात हात दिला.

जामनगर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करून महिना नाही होत तोच त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जामनगर जिल्ह्यातील कालवाड शहरात रविवारी झालेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह आणि बहिण नैनबा यांनी काँग्रेसच्या हातात हात दिला. यावेळी जामनगरमधील काँग्रेसचे उमेदवार मुलू कंडोरिया हेही उपस्थित होते.

जामनगरमधून हार्दिक पटेल काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. जडेजाची पत्नी रिवाबा हिने नुकताच जामनगरच्या खासदार पुनमबेन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये 26 लोकसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After wife joining BJP Ravindra Jadejas father sister join Congress