अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

बालासोर- आण्विक क्षमता असलेल्या अग्नी-4 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने आज (सोमवार) यशस्वी चाचणी घेतली. या आधुनिक क्षेपणास्त्रामुळे भारताचे लष्करी सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

ओडिशाच्या किनारपट्टीवरील दामरा गावाच्या जवळ असलेल्या अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने एका रोड-मोबाईल प्रक्षेपकावरून अग्नी-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अग्नी-4 हे लांब पल्ल्याचे आंतरखंडीय स्वानातीत क्षेपणास्त्र असून, चार हजार किलोमीटर एवढ्या अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यामध्ये आहे. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) वतीने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून अण्वस्त्रांचा वापर करता येऊ शकतो. सुमारे एक टन स्फोटके वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे. 

मध्यम ते लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र असून, सध्या ते चाचणीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत अग्नी-1, 2, 3 ही तीन प्रकारची क्षेपणास्त्रे लष्करी वापरासाठी सज्ज झाली आहेत. मागील महिन्यात अग्नी-5 क्षेपणास्त्राचे शेवटच्या टप्प्यातील कॅनिस्टर चाचणीदरम्यान यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. 

Web Title: Agni-IV missile clears final test