'अग्निवीरां'ची बनावट भरती! माजी सैनिकानं घातला लाखोंचा गंडा : Agniveer fake recruitment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agniveer Recruitment

Agniveer Fake Recruitment: 'अग्निवीरां'ची बनावट भरती! माजी सैनिकानं घातला लाखोंचा गंडा

Agniveer fake recruitment: केंद्र सरकारनं तिन्ही सैन्य दलांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी 'अग्नीवीर' योजना आणली. ही योजना वादाच्या भोवऱ्यातही अडकली होती. पण आता या भरतीमधील गैरप्रकार समोर आला आहे. अग्निवीरसाठीचं बनावट भरतीचं रॅकेट समोर आलं आहे. (Agniveer fake recruitment case Kerala ex servicemen doing this scam)

केरळच्या त्रिवेंद्रम इथं हा प्रकार घडला असून इथल्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, कोल्लम जिल्ह्यात राहणारा बिनू एम. नावाचा एक माजी सैनिक 'अग्नीवीर' भरतीचं बनावट रॅकेट चालवत होता. यासाठी त्यानं इंडियन आर्मीच्या नावानं केरळमधील २५ ते ३० जणांची नोकरीच्या आमिषानं फसवणूक केली. तसेच त्यांच्याकडून सुमारे ३० लाख रुपये उकळले आहेत.

हेही वाचा: Shiv Sena Symbol Row: 'धनुष्यबाणा'चा पेच कायम? निकाल आजही नाहीच; 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी

'अग्नीवीर'ची पहिली बॅच नुकतीच बाहेर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे. लष्करभरतीचं स्वप्न बाळगलेल्या तरुणांनी यासाठी सहा महिन्यांचं लष्करी प्रशिक्षण घेतलं आहे. यानंतर ते लष्करात विविध सेवांमध्ये रुजू झाले आहेत. मोदी सरकारसाठी 'अग्नीवीर' हा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडवणारा महत्वाचा कार्यक्रम आहे.

हेही वाचाः मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नीवीर योजना जाहीर केल्यानंतर ही तरुणांची दिशाभूल करणारी योजना असल्याचं सांगत त्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी स्वतः पत्रकार परिषदा घेऊन ही योजना कशी चांगली आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच विरोध करणाऱ्यांचे आरोपही खोडून काढले होते.