

Agniveer Jobs Uttarakhand
esakal
सैन्यात चार वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना सरकारी नोकरी मिळवताना पुन्हा कठीण भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये, यासाठी उत्तराखंड सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) राज्यातील भरती नियमांमध्ये बदल करण्याची शिफारस केली असून, माजी अग्निवीरांना काही सरकारी भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांमधून सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्द्धन यांना पत्र लिहून यासंदर्भात भरती नियमांमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. राज्य सरकारकडून या प्रस्तावावर पुढील कार्यवाही सुरू आहे.