esakal | रुग्णाच्या मृत्यूची अफवा; हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना फॅन-हेलमेट-रॉडनं मारामारी, Video व्हायरल

बोलून बातमी शोधा

रुग्णाच्या मृत्यूची अफवा! हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना फॅन-हेलमेट-रॉडनं मारामारी; Video व्हायरल
रुग्णाच्या मृत्यूची अफवा! हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना फॅन-हेलमेट-रॉडनं मारामारी; Video व्हायरल
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना महामारीमुळे देशात आरोग्य सुविधांचा बोजवारा उठला आहे. रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारीही दिवसरात्र झटत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे ओव्हरटाईमही करावा लागत आहे. रुग्णांसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशमध्ये चोपल्याचा प्रकार समोर आला आहे. आग्रा येथील एका खासगी रुग्णालयात कर्मचारी आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हामामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची अफवा पसरली होती. त्यानंतर हॉस्पिटल कर्मचारी आणि रुग्णाच्या नातेवाईकामध्ये हाणामारी झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना फॅन-हेलमेट-रॉड यानं बेदम मारामारी केली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. लोकांना महिला कर्मचाऱ्यांनाही जोरादर मारलं. व्हिडिओ पाहून तुम्हालाही राग आल्याशिवाय राहणार नाही.... पाहा व्हिडिओ ....

मृत्यूच्या अफवेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांना राग अनावर आला होता. हाणामारी करणाऱ्यांना रोखण्याऐवजी उपस्थित लोकांनी रुग्णालयाचीच तोडफोड केली. रुग्णालयाचे दरवाजे, खिडकी, फॅन यांच्यासह रुग्णालयातील सर्व सामानांची तोडफोड केली. एका नर्सनं तोडफोडीला विरोध केला पण जमावानं तिलाच मारहाण केली.