लाचखोर डॉक्‍टरने दोन हजारांची नोट गिळली

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

अहमदाबाद : लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर एका पशुचिकित्सकाने यापासून सुटका करून घेण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट गिळून टाकली. गुजरातमधील पाटन जिल्ह्यात ही घटना घडली. लाचलुचपत विभागाकडे पशुचिकित्सकाने दोन हजारांची लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार त्याला लाच देण्यात आली. मात्र आपन रंगेहाथ पकडल्याचे लक्षात येताच डॉक्‍टरने दोन हजारांची नोटच गिळून टाकली. नोट गिळल्यानंतर पाणीही प्यायला सुरवात केली. त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या.

अहमदाबाद : लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर एका पशुचिकित्सकाने यापासून सुटका करून घेण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट गिळून टाकली. गुजरातमधील पाटन जिल्ह्यात ही घटना घडली. लाचलुचपत विभागाकडे पशुचिकित्सकाने दोन हजारांची लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार त्याला लाच देण्यात आली. मात्र आपन रंगेहाथ पकडल्याचे लक्षात येताच डॉक्‍टरने दोन हजारांची नोटच गिळून टाकली. नोट गिळल्यानंतर पाणीही प्यायला सुरवात केली. त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दोन हजारांची नोट पोटातून काढण्यासाठी संबंधित डॉक्‍टरला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या घडामोडींमुळे शुक्रवारी गुन्हा नोंद होऊ शकला नाही.

याबाबत बोलताना लाचलुचपत विभागाचे अधिकारी म्हणाले की, ""नोट पोटातून बाहेर आल्यास भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण पुरावा हाती येणार आहे. या नोटेवर असणार नंबर हा आमच्याकडे नोंद असून तो नंबर न मिळाल्यास या प्रकरणाला काही अर्थ राहणार नाही. कोणत्याही गुन्ह्यापासून स्वत:ला वाचविण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. मात्र ही घटना दुर्मिळ आहे.''

 

 

. . . . . .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ahmedabad news bribe doctor note