
Air India 787 dreamliner: अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये रोज नवनव्या बाजू समोर येत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर अनेक तज्ज्ञांचं एकमत झालं आहे- तो असा की, विमानाचे दोन्ही इंजिन बंद झाल्याने अपघात झाला.. विमानाला थ्रस्ट म्हणजे पॉवर मिळत नव्हती. मात्र अपघातग्रस्त विमानाची क्षमता नेमकी कशी कमी झाली, याबाबत तेच विमान चालवणाऱ्या वैमानिकाने धक्कादायक मुद्दा उपस्थित केला आहे.