
गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 171 विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच ते कोसळले. बीजे मेडिकल कॉलेजच्या परिसरात विमानाचे तुकडे पडले, आणि 241 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला. पण, त्याहून अधिक वेदनादायी आहे ती कुटुंबांची कहाणी, जी आपल्या प्रियजनांच्या अवशेषांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीसाठी रांगेत उभी आहे.