Ahmedabad Plane Crash: विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल अजून बनलाच नाही; व्हायरल होत असलेली माहिती खोटी

AAIB Submits Initial Findings on Ahmedabad Air India Crash: या दुर्दैवी अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर जमिनीवरील अनेक लोकही याच्या कचाट्यात सापडून मरण पावले.
Ahmedabad Plane Crash: विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल अजून बनलाच नाही; व्हायरल होत असलेली माहिती खोटी
Updated on

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या पथकाने आपला प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर केला आहे, अशी माहिती न्यूज एजन्सी एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. मात्र अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाच्या (एआय-१७१) झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल अद्याप संसदीय समितीला सादर केला नसल्याचे विमान अपघात तपास प्राधिकरणाने (एएआयबी) स्पष्ट केले आहे.

‘ब्लॅक बॉक्स’मधून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर हा अहवाल संसदीय समितीला सादर झाला असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, तपास सुरू असल्याने असा कोणताही अहवाल अद्याप तयार केला नसल्याचे ‘एएआयबी’ने स्पष्ट केले. तसेच, हा अहवाल महिनाभरात प्रसिद्ध केला जाईल, असेही सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com