

AI crop disease diagnosis app
esakal
तांत्रिक शिक्षण घेणारे तरुण आता केवळ नोकरीच्या शोधात न राहता नाविन्यपूर्ण उद्योग उभारत आहेत. विद्यापीठांच्या इनोव्हेशन हबमधून विकसित होत असलेल्या स्टार्टअप्समुळे रोजगारनिर्मितीचे नवे मार्ग खुले होत आहेत. अशाच एका उपक्रमातून आदर्श सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित पीक रोग ओळख प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करून त्यावरील उपाय तात्काळ मिळणार आहेत.