
AIADMK च्या हद्दपार नेत्या शशिकला यांची बेंगळुरु तुरुंगातून सूटका करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- AIADMK मधून हकालपट्टी झालेल्या नेत्या शशिकला यांची बेंगळुरु तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर बुधवारी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेसंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे असले तरी विक्टोरिया हॉस्पिटलमधील त्यांचे उपचार सुरुच राहणार आहे. शशीकला यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांना 66 कोटी रुपयांच्या संपत्तीप्रकरणी फेब्रुवारी 2017 मध्ये तुरुंगात जावं लागलं होतं. आता चार वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर शशिकला यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती आणि त्यांच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या. समर्थकांनी यादरम्यान पेढेही वाटले.
काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; 4 जवान जखमी
शशिकला यांची प्रकृती स्थिर
कोरोनाची लागण झाल्याने शशिकला यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. विक्टोरिया हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातील कोरोनाची लक्षणं कमी झाली असून प्रकृती स्थिर आहे. शिक्षा भोगत असतानाच त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. भ्रष्टाचारप्रकरणी त्या शिक्षा भोगत होत्या.