तमिळनाडूत राजकीय भूकंप; शशिकलांचा राजकीय संन्यास!

वॉल्टर स्कॉट
Wednesday, 3 March 2021

शशिकला यांचे भाचे टीटीव्ही दिनकरन यांनी हे निवेदन प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले.

चेन्नई (तमिळनाडू) : तमिळनाडूच्या राजकारणात बुधवारी (ता.३) रात्री मोठा भूकंप झाला. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही.के. शशिकला यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली. शशिकला यांनी यासंदर्भात एक सविस्तर निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे.

रुबाब खाकीचा, विषय नाही बाकीचा! PSI पल्लवी जाधव ठरल्या 'मिस इंडिया' फर्स्ट रनर अप!​

या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘मी आता राजकारण सोडत आहे. जयललिता यांच्या सुवर्ण राजवटीचे दिवस पुन्हा राज्यामध्ये यावेत म्हणून प्रार्थना करते. आगामी निवडणुकीमध्ये पक्षाच्या विजयासाठी अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी एकीने काम करावे.’’ आपल्याला कधीच सत्ता अथवा पदाची हाव नव्हती. आपल्या सर्वांचा सामाईक शत्रू असणाऱ्या द्रमुकच्या पराभवासाठी आपण एकत्र यायला हवे, असे आवाहन देखील शशिकला यांनी केले आहे. शशिकला यांचे भाचे टीटीव्ही दिनकरन यांनी हे निवेदन प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले.

बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा? सोशल मीडियात चर्चांना उधाण​

दिनकरन यांच्याशी चर्चा
शशिकला यांनी राजकारण सोडू नये म्हणून आपण त्यांना खूप विनंती केली होती, पण त्या आपल्या निश्‍चयावर ठाम होत्या. एएमएमकेचा राजकीय प्रवास भविष्यामध्ये देखील सुरूच राहील. आगामी निवडणुकीमध्ये आघाडीसाठी आपला पक्ष अन्य समविचारी पक्षांसोबत चर्चा करेल, असेही दिनकरन यांनी स्पष्ट केले.

जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव​

भाजपचा आग्रह
शशिकला यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आग्रही होते. यासाठी अण्णाद्रमुककडे तशी विनंतीही करण्यात आली होती. आता त्यांनीच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सगळे चित्र बदलले आहे. शशीकला यांनी त्यांचे निवेदन एयूएडीएमकेच्या प्रसिद्धी पत्रकातून जारी केले आहे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या नावामागे सरचिटणीस असे पद देखील लावले आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIADMK leader VK Sasikala quits politics Tamil Nadu Election 2021