Crime: एअरफोर्स कॅडेटची खोलीत आत्महत्या? चिठ्ठीत आढळली अधिकाऱ्यांची नावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime: एअरफोर्स कॅडेटची खोलीत आत्महत्या? चिठ्ठीत आढळली अधिकाऱ्यांची नावे

बंगळूर : बंगळुरच्या एअर फोर्स टेक्निकल कॉलेजमध्ये 21 सप्टेंबर रोजी 27 वर्षीय कॅडेट प्रशिक्षणार्थी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याने लिहीलेल्या चिठ्ठीत काही अधिकाऱ्यांची नावे सापडल्यानंतर हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलाहल्ली येथील AFTC येथे ही घटना घडली.

(Air Force Cadet Found Dead in Bengaluru)

अंकित कुमार झा (वय 27) असं मृत प्रशिक्षाणार्थ्यांचं नाव असून त्याने लिहीलेल्या चिठ्ठीत एअर कमांडर, विंग कमांडर आणि ग्रुप कॅप्टन अशा अधिकाऱ्यांचा उल्लेख होता. तर कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्यावर सतत छळ होत असल्याचा आरोप अंकितच्या कुटुंबियांनी केला आहे. तर तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित झा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

"अंकितला कामावरून काढून टाकल्यानंतर त्याने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. तर आरोप करण्यात आलेले आरोपी फरार नसून मृताच्या भावाने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींवर आयपीसीच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही आत्महत्या केल्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आणि कुटुंबियांनी केलेल्या आरोपाच्या आधारे पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न करत आहोत" अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :crimeairforcebengaluru