उत्तराखंडात 11 ट्रेकर्सचा मृत्यू; NDRF दाखल, बचाव कार्य सुरू

Uttarakhand
Uttarakhandesakal
Summary

उत्तराखंडमध्ये पावसानं रौद्ररुप धारण केलं असून राज्याला मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये पावसानं रौद्ररुप धारण केलं असून राज्याला मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं आहे. सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं, तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दरम्यान, हवाई दलानं (Airforce) उत्तराखंडमधील (Uttarakhand) लमखागा खिंडीत 17,000 फूट उंचीवर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य (Rescue Operation) सुरू केलंय. जिथं जोरदार हिमवर्षाव आणि खराब हवामानामुळं 18 ऑक्टोबर रोजी 17 पर्यटकांसह ट्रेकर्संची वाट चुकली होती. लमखागामध्ये आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात NDRF ला यश आलं असून हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याला उत्तराखंडच्या हरसिलशी जोडणारा हा सर्वात धोकादायक मार्ग आहे.

उत्तराखंडातील महापुरामुळं आतापर्यंत एकूण 52 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलानं उत्तराखंडात बचाव कार्याला सुरुवात केली असून NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या हिमवर्षावात 11 ट्रेकर्संचा देखील मृत्यू झाल्याचं कळतंय. सध्या NDRF पथकासह हेलिकॉप्टरद्वारे 19,500 फूट उंचीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली सापडल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Uttarakhand
थायलंडमध्ये 45 देशांसाठी 'Quarantine Free'ची घोषणा

राज्य शासन तसेच लष्कराकडून बचाव कार्याला वेग देण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत आहे. कुमाऊ भागामध्ये ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत बचाव पथकाला 15,700 फूट उंचीवर चार मृतदेह सापडले आहेत, तर 16,800 फूट उंचीवर एका व्यक्तीला वाचवण्यात लष्कराला यश आलंय. बचाव पथकाने मृतदेह स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com