Air India-Airbus Deal : एअर इंडिया अन् एअरबसमध्ये इतिहासातील सर्वात मोठा करार

या करारांतर्गत टाटा समूह एअरबसकडून 40 वाइड-बॉडी A350 आणि 210 लहान विमाने खरेदी करणार आहे.
Air India-Airbus Deal
Air India-Airbus DealSakal

Air India-Airbus Deal : टाटा समूहाने मंगळवारी फ्रेंच कंपनी एअरबससोबत इतिहासातील सर्वात मोठा करार केला आहे.

हेही वाचा : सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार?

टाटांच्या एअर इंडियासाठी 250 विमाने खरेदी करण्याचा हा करार असून, दोन्ही कंपन्यांमधील हा करार आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे बोलले जात आहे.

या करारांतर्गत टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन एअरबसकडून 40 वाइड-बॉडी A350 आणि 210 लहान-बॉडी विमाने खरेदी करणार आहे.

या करारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली.

यादरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे या मोठ्या करारासाठी अभिनंदन केले.

त्याचवेळी मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांना प्रिय नरेंद्र असे संबोधित केले आणि या नवीन करारासाठी त्यांचे आभार मानले.

Air India-Airbus Deal
BBC IT Raid : BBC कार्यालयावर IT रेड नव्हे तर, सर्व्हे; जाणून घ्या IT Raid अन् IT Survey मधील फरक

काय म्हणाले मोदी

व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान मोदी म्हणाले की, 'आजच्या ऐतिहासिक करारासाठी एअर इंडिया आणि एअर बसचे अभिनंदन आणि शुभेच्छा. हा महत्त्वाचा करार भारत आणि फ्रान्समधील घनिष्ठ संबंध तसेच भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील यश आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतो.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थैर्याचा मुद्दा असो किंवा जागतिक अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा असो, भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे सकारात्मक योगदान देत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

Air India-Airbus Deal
Delhi Crime : 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी दिल्ली हादरली; फ्रिजरमध्ये आढळला प्रेयसीचा मृतदेह

भारताच्या 'मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड' व्हिजन अंतर्गत एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नवीन संधी उपलब्ध होत असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला पुढील 15 वर्षांत 2 हजारहून अधिक विमानांची गरज असल्याचे ते म्हणाले.

एअर इंडिया एअरबसकडून 250 विमाने घेणार आहे. यातील 40 वाइड बॉडी तर 210 नॅरोबॉडी विमाने असतील. यासाठी एअरबसशी करार झाला आहे. मोठ्या आकाराच्या विमानाचा वापर लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी केला जाणार असल्याचे टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com