Air India Crash: विमान अपघातावर माध्यमांनी निष्कर्ष देऊ नयेत; अपघाताचे खरे कारण अंतिम अहवालातून समोर येईल : राममोहन नायडू
Ram Mohan Naidu: एअर इंडिया एआय-१७१ विमानाच्या अपघाताची चौकशी पारदर्शीपणे सुरू आहे. अंतिम अहवाल निःपक्ष व वस्तुनिष्ठ असेल, अशी माहिती नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिली.
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन एआय-१७१ बोइंग-७८७ विमान अपघाताची विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) पारदर्शीपणाने चौकशी करीत असून अंतिम अहवाल वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष असेल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज राज्यसभेत दिली.