
नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’ने मंगळवारी पाच विमानांची उड्डाणे तांत्रिक कारणामुळे रद्द केली. ही सर्व विमाने बोइंग कंपनीची ७८७-८ ड्रीमलाइनर आहेत. अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानांची काटेकोरपणे तपासणी केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळित झाल्याचे मानले जात आहे.