esakal | एअर इंडियाचा मोठा निर्णय; या तारखेपासून सुरु करणार विमानसेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Air India estimates partial services likely to resume by mid-May

एअर इंडीयाने एक मोठा निर्णय घेतला असून मे महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे १५ मेपासून आपली सेवा सुरु करणार असल्याचे एअर इंडीयाने म्हटले आहे. देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करण्याचा विचार सुरु आहे. एअर इंडीयाने यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.

एअर इंडियाचा मोठा निर्णय; या तारखेपासून सुरु करणार विमानसेवा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एअर इंडीयाने एक मोठा निर्णय घेतला असून मे महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे १५ मेपासून आपली सेवा सुरु करणार असल्याचे एअर इंडीयाने म्हटले आहे. देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करण्याचा विचार सुरु आहे. एअर इंडीयाने यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एअर इंडीयाने आपले पायलट्स आणि क्रू मेंबर्सना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. हवाई सेवेशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे ही माहिती पोहोचवण्यात आली आहे. या ईमेलमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सेक्युरीटी पासची माहीती देण्यात आली आहे. १५ मे नंतर आम्ही साधारण ३० टक्के उड्डाण सुरु करण्याचा विचार करत असल्याचे यामध्ये लिहिले आहे. तुम्ही सर्वासाठी तयार राहा. कोरोना वायरसचे वाढते संकट पाहता २५ मार्चपासून लॉकडाऊनचा कालावधी वाढवत ३ मे पर्यंत नेण्यात आला आहे.

जगभरातील निम्म्या कामगारांचा रोजगार जाणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा इशारा

कोरोना वायरसच्या संकटामुळे संपूर्ण देश ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. यामुळे रस्ते, रेल्वेपासून हवाई मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. आता ३ मेनंतर सरकार लॉकडाऊन उठवणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला विचारला जात असला तरी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच एअर इंडियाने १५ मेला विमानसेवा सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

loading image