

नवी दिल्लीः फ्रान्सिस्कोवरुन दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (AI174 ) अचानक बिघाड झाल्याने मंगोलियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाने उड्डाण केल्यानंतर फ्लाईट क्रूला संभाव्य तांत्रिक बिघाड जाणवला. त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानाला मंगोलियातल्या उलानबातर एअरपोर्टवर उतरवलं.